धरणगाव (प्रतिनिधी) दि. २० डिसेंबर २०२० रविवार रोजी महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे. एस. पवार यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे. एस. पवार, हेमंत माळी, पी. डी. पाटील, व्ही. टी. माळी तसेच शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.