धरणगाव (प्रतिनिधी) येथील गोसावी परीवार जवळील पुरातन जागृत देवस्थान गोब्रेश्वरी माता मंदिराचे जिर्णोध्दार कोट बाजार परीसरातील बागुल परीवाराचा सहकारातुन साकार होत आहे. तसेच पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, शासकीय स्टॅम्प वेडंर विनायक काका बागुल तसेच त्यांच्या सर्व बागुल परीवाराचे महिला /पुरुष सर्व सदस्य उपस्थित होते