धरणगाव (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाअध्यक्ष रविंद्र भालेराव यांनी नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार नितीन देवरे यांना दिले.
केंद्र सरकारच्या सत्तेत दिवसेंदिवस वाढलेले इंधनचे दर, डिझेल, पेट्रोल, गॅस व खाद्यतेल, अन्नधान्यचे दर कोरोनाच्या काळात गरीब लोकांचे मोठे हाल होतांना दिसत आहे. तरी वाढीव दरावर शासनाने नियंत्रण राखुन योग्यपणे निर्णय घेण्यात यावे व अन्न सुरक्षा योजनेतील लाभ धारकांना प्रति ७ ते ८ किलो धान्य देण्यात यावे व शासनाने मागणीची अंबलंबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष रविंद्र भालेराव, आर. पी .आय शांताराम सोनवणे, प्रेमराज भालेराव, संतोष भालेराव आदी उपस्थित होते.