नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक व्यक्ती चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला आणि लग्नही केलं. पण त्यानंतर जे झालं ते अजून अवाक् करणारं होतं. हनीमूनसाठी त्याने जमीन विकली आणि मग दागिने आणि रक्कम घेऊन महिला फरार झाली. दरम्यान, महिला आधीच विवाहित आहे आणि तिला मुलंही आहेत, हे जेव्हा या व्यक्तीला समजलं तेव्हा सर्वात मोठा धक्का बसला.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘लुटेरी दुल्हन’ ची ही शिकार मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील आहे. पीडित व्यक्तीने एसपी ऑफिसमध्ये पोहोचून घडलेल्या सर्व प्रकाराची लिखित माहिती दिली. तक्रारीत तो म्हणाला की, त्याची पत्नी लाखो रूपये रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. आता ती परत येण्याचं नावंही घेत नाहीये.
२ पीडित तरूणाने सांगितलं की, २ वर्षाआधी लॉकडाऊन दरम्यान तो उषा पाल नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला होता. महिला रेल्वे स्टेशन बाहेर चहाचं दुकान लावत होती. तो तिथे सकाळी फिरायला जात होता तेव्हा दोघांमध्ये ओळख झाली. नंतर दोघे प्रेमात पडले. काही वर्ष अफेअर चाललं आणि त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केलं.
लग्न झाल्यावर काही दिवस सगळं काही ठीक सुरू होतं. पण पत्नीने दागिन्यांची मागणी केली. सोन्याची चेन, कानातले आणि काही इतर दागिने त्याने तिला घेऊन दिले. बॅंक अकाउंटमध्ये दोन लाख रूपये ठेवले होते. तेही तो घरी घेऊन आला. नंतर एक दिवस पत्नीने पतीला बाजारातून काही सामान आणण्यास सांगितलं. जेव्हा पती घरी आला तेव्हा पत्नी घरी नव्हती. ती दोन लाख रूपये कॅश आणि दागिने घेऊन फरार झाली.
विवाहित आणि मुलांची आई होती महिला
आता पत्नी ना त्याच्याकडे परत आहे ना पैसे आणि दागिने परत देत आहेत. पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याला काही दिवसांपूर्वी समजलं की, त्याची पत्नी विवाहित आहे आणि तिला मुलंही आहेत. अशात तो हैराण झाला आहे.