धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
तालुक्यातील रोटवद ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाला असून यात यात ८ जणांचा विजयी निकाल समोर आला आहे. विजयी उमेदवारांमध्ये सुनिता पाटील, मोहन शिंदे, महेंद्र पारधी, विशाल पाटील, रत्ना पाटील, वैशाली पाटील, श्रीराम पाटील, रेखाबाई पाटील यांचा समावेश आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक मोतीआप्पा पाटील यांचे पॅनल याठिकाणी विजयी झाले आहे. विजयी उमेदवारांचे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी अभिनंदन केले आहे.