TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

७ दिवसात आरटीओ कार्यालय सुरु करून दाखवले, अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही : ना. गिरीश महाजन !

चाळीसगाव येथे MH 52 उपप्रादेशिक परिवहन कार्यालायचे उद्घाटन सह विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कार्यालय चाळीसगाव येथे होणं सोपं नाही. आमदार मंगेश चव्हाण कुठलंही काम हाती घेतल्यावर पूर्ण करतात ते तालुक्याचा विकास करीत आहेत त्यांनी सतत पाठपुरावा करून RTO कार्यालयाचे काम मंजूर करून आणले. दूरदृष्टी असलेला आमदार, नेता तालुक्याला मिळाला आहे. अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या येथील महात्मा फुले कॉलनीतील शहीद हेमंत जोशी क्रिडांगण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कार्यालय व नवीन वाहनाना MH 52 नोंदणी शुभारंभ सह विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन व शुभारंभ प्रसंगी चाळीसगाव येथे ते बोलत होते.

चाळीसगाव येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्याला पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार संजयभाऊ सावकारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, शेंदुर्णी येथील संजयदादा गरुड, दुध संघ संचालक रोहित निकम, पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार, मधुभाऊ काटे, अमोल नाना पाटील, यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,दळवळण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन वाहन धारकांना MH52 नंबर ची पासिंग नोंदणी देण्यात आली. ते म्हणाले की मोदी सरकार मध्ये सर्व कामे होत आहेत देश सुसाट सुटलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय फक्त 7 दिवसात सुरु करून नूतन कार्यालयासाठी 40 कोटी रुपये देखील मंजूर करून घेतले आहेत चाळीसगाव तालुक्यात मंगेश चव्हाण यांनी जनतेसाठी सर्वच कार्यालये केली आहेत आता फक्त विमानतळ आणणे बाकी आहे असे कौतुक देखील त्यांनी केले. मी गेली 6 टर्म आमदार म्हणून निवडून आलो, तुमच्या कडून देखील मला हिच अपेक्षा आहे अशा शुभेच्छा देखील दिल्या.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालक मंत्री यांनी देखील आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक केले ते म्हणाले की चाळीसगाव व भडगाव येथे MH 52/MH54 हे RTO कार्यालय झाले आमदार किशोर पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांचे काम चांगलं आहे. चाळीसगाव च्या कार्यालयामुळे जवळपास 120 कि मी चं अंतर कमी होवून अपघाताचं प्रमाण देखील कमी होणार असून चाळीसगाव ची MH 52 ही दुसरी ओळख झाली आहे आमदार म्हणून दमदार काम मंगेश दादांनी केलं चाळीसगाव तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

MH52 चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव वासीयांना अर्पण : आमदार मंगेश चव्हाण !

चाळीसगाव तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असून राज्यात नव्हे तर देशभरात MH52 ही आपली वेगळी ओळख निर्माण होणार आहे. भारतीय जनता पक्षाने संधी दिली, ना.गिरीशभाऊ महाजन यांनी विश्वास दाखवला आणि चाळीसगाव तालुक्याच्या जनतेने आशिर्वाद दिले म्हणून मी हे काम करू शकत आहे. त्यामुळे MH52 चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव वासीयांना नम्रपणे अर्पण करत आहे.

राज्यात गेल्या 13 वर्षात राज्यात कुठेच RTO कार्यालय मंजूर झाले नाही. प्रशासकीय स्तरावर एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागतो. ना.गिरीश भाऊंचे आशिर्वाद तसेच महायुती सरकार यामुळेच हे कार्यालय मंजूर करणे शक्य झाले. चाळीसगाव तालुक्यात जवळपास सव्वालाख वाहने आहेत या वाहनांचे पासिंग, फिटनेस आदी कामासाठी जवळपास 120 किमी जळगांव येथे जावे लागत होते ते आता होणार नसून सर्व कामे चाळीसगाव येथे होणार आहेत. तसेच सदर मैदानावरील कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालय बांधकामासाठी बिलाखेड येथील शासकीय जागा मागणी केली आहे व इमारत बांधकामाचा ३७ कोटींचा प्रस्ताव देखील पाठवला आहे.

यासोबतच चाळीसगाव तालुक्यात आज एकाच वेळी चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या 259 घरांच्या वसाहतीचे बोढरे येथे भूमिपूजन, तालुका क्रीडा संकुल येथे नूतनीकरण व अद्ययावतीकरण आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

चाळीसगाव तालुक्यातील २०२१ मधील महापूरग्रस्तांना ६ कोटींची मदत मिळाली असून दुष्काळग्रस्तांसाठी 133 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले आहेत, लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व तिसऱ्या क्रमांकाचे शहर मात्र साधी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नव्हती, नाट्यगृह नव्हत, आज चाळीसगाव शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, कोर्ट, उत्पादन शुल्क, नाट्यगृह, रेस्ट हाउस, पोलीस हौसिंग आदी इमारती काम सुरु असून व काही काम पूर्ण देखील झाले आहेत. पदापेक्षा कामात जास्त विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. चाळीसगाव तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

चोपडा येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास शासनाची मान्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात धावत्या रेल्वेत चढणे तरुणाला पडले महागात ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

January 11, 2021

वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला ठार !

January 8, 2024

पालिका निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार ; प्रारूप रचनेचा आराखडा तयार करण्यास वेग !

September 16, 2021

जळगावात महिलेच्या गळ्यातून सोनपोत लंपास !

October 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group