जळगाव (प्रतिनिधी) सै. नियाज अली फाऊंडेशनतर्फे त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच त्रिपुरा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम, त्यांच्या धार्मिक स्थळ व मालमत्तेचे योग्य संरक्षण होण्यासाठी आवश्यक ते पावले उचलून सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी विनंतीही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आपला महान भारत देश हा गंगा जमुना तहजीब (राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव)ला मानणारा असून विविधतेत एकता हा आपल्या संविधान व प्राचीन परंपरेचे वैशिष्ट्य आहे. परंतु आपल्या भारतातील त्रिपुरा येथे काही जातीयवादी समाजकंटकांनी तिथल्या अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्थळ (मस्जिद) तसेच घरांवर हल्ला, जाळपोळ करून निष्पाप निर्दोष लोकांना विनाकारण मारहाण करण्यात आली. त्यामुळे अल्पसंख्यांक मुस्लिम समुदाय अत्यंत घाबरलेला असून तणावाखाली आहे. हे कृत्य म्हणजे आपल्या भारत देश, संस्कृती व संविधानावर हल्ला असून आज सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्याद्वारे निवेदन पाठविण्यात आले. तसेच या दुःखद व संतापजनक घटनेचा व या घटनेला कारणीभूत समाजकंटकांचा निषेध करून त्रिपुरा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम, त्यांच्या धार्मिक स्थळ व मालमत्तेचे योग्य संरक्षण होण्यासाठी आवश्यक ते पावले उचलून सुरक्षा प्रदान करण्यात यावी, तसेच या समाजकंटकांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.
निवेदनावर सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सय्यद अयाज अली नियाज अली, योगेश मराठे, सुरज गुप्ता, शेख शफी, सय्यद उमर, हाजी मोहम्मद रफीक, शेख शफीक अहमद, वसीम जाफर, मोहम्मद फारूक तेली, हाजी अब्दुल्ला, वसीम कलिमुद्दिन, शेख नजीर उद्दीन उपस्थित होते.
















