धरणगाव (प्रतिनिधी) गिरणा नदी पत्रातून वाळू चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव शिवारातील सिध्दीविनाय क प्लॉट भागातील गिरणा नदिपत्रातून विकास भिका वाघ (वय- ३९, रा.बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) या तरुणाला निळ्या रंगाच्या विना क्रमांकाचे ट्रक्टर आणि ट्रालीतून ३ ब्रास वाळू चोरी करून नेतांना पोलिसांनी पकडले. याप्रकरणी पो.कॉ. ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहेत.
तर बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव शिवारातील वैजनाथ ते बांभोरी प्र.चा. रोडवर के.बी.एक्स. कंपनीजवळ मयुर दिनकर पाटील (वय- २५ वर्ष, रा. साकेगाव ता. भुसावळ) याला पोलिसांनी अशोक लेलन्ड कंपनीचे पिवळ्या रंगाचे डंप्पर क्रं. MH १९ CY ००१० यातून सहा हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू चोरून नेतांना पकडले. याप्रकरणी पो.कॉ. सुनील पाटील यांच्याफिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहेत.
















