धरणगाव (प्रतिनिधी) येथे नेहरू युवा केंद्र जळगाव, जय अंबे ग्रुप आणि राजीव गांधी युवा मंडळतर्फे रविवारी महात्मा गांधी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रविवारी सकाळी ७ वाजता युवकांनी धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक हितेश ओस्तवाल, जय अंबे ग्रुपचे अध्यक्ष निलेश महाले, आकाश चव्हाण, राजीव गांधी युवा मंडळाचे अध्यक्ष गौरवसिंग चव्हाण, मयूर दानेज, ललित रॉय, सुजल आणि प्रथम उपस्थित होते. उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांचे मार्गदर्शन लाभले.