धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळीवाडा परिसरातील अंगणवाडी क्रमांक १३४ या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मोठा माळीवाडा परिसरातील माता-भगिनी लाभार्थ्यांचे पालक व बालके उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते हेमत माळी यांनी आपल्या मनोगतातून सावित्री आईंच्या शैक्षणिक धोरणाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बयस, रवी महाजन, ई. उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील मुलींनी वेशभूषा परिधान करून सावित्रीबाईंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला माळीवाडा परिसरातुन लाभार्थी बालकांचे पालक वर्ग, माता-भगिनी उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका कल्पना भामरे, व मदतनीस बेबीबाई शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.