धरणगाव (प्रतिनिधी) जागतिक मतिमंद दिनानिमित्त इन्स्टिट्युट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस जळगाव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय व प्रौढ मतिमंद मुलांची सरंक्षित कार्यशाळा जळगाव यांनी अतिउत्साहात वेगवेगळ्या शालेय स्तर क्रीडा स्पर्धा घेऊन आई कुलस्वामिनी एकविरा माता मंदिर चमगाव या ठिकाणी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन चमगांव गावाचे प्रथम नागरिक माननीय सरपंच श्री.भगवान पंडित सावंत ,पोलीस पाटील अविनाश चिंतामण सोनवणे ,ग्रामसेवक भाऊसाहेब सुनील चौधरी मधुकर रघुनाथ पाटील,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते आई एकविरा मातेची पूजा करण्यात आली.तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेतील कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय बोरसे सर यांनी ८ डिसेंबर जागतिक मतिमंद दिन व विद्यार्थ्यांबद्दल उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांना माहिती दिली.मान्यवरांमध्ये चमगांवचे ग्रामसेवक भाऊसाहेब सुनिल चौधरी यांनी गावात कार्यक्रम साजरा केल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच दिव्यांगाच्या 5 टक्के निधी बाबत ग्रामस्थांना अवगत केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी रंगीत बॉल उचलून कटोऱ्यात टाकणे,सॅक रेस,दोरीला टांगलेली चिक्की तोंडाने तोडणे,फुगे फोडणे,गोलात चेंडू टाकणे,बिस्कीट खाणे,तीन पायाची शर्यत अश्या विविध स्पर्धाचे उदघाटन करून खेळ घेण्यात आले. शाळा व कार्यशाळा यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तदनंतर मुकेशभाऊ विसावे टेलर व ग्रामस्थांकडून आलेले बिस्कीट व चॉकलेट याचे वाटप करून सर्वांनी भरीत,पुरी,कोशिंबीर,जिलेबी,काजू कतली याचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वीते साठी सरोज बडगुजर विशेष शिक्षिका, अरुण हडप विशेष शिक्षक,सुनिल सोनवणे विशेष शिक्षक,अक्षय कुलकर्णी विशेष शिक्षक, वैशाली भोळे विशेष शिक्षिका, दिनकर न्हावी पहारेकरी,गोविंद पाटील शिपाई ,शांताबाई मानकरी काळजीवाहक,अतुल साळुंखे बस चालक यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विशेष शिक्षक राहुल पाटील यांनी केले.
















