धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिक्षिका दामिनी पगारिया यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांच्या जीवन कार्याबद्दल तसेच विज्ञान दिन का साजरा केला जातो? याबद्दल सविस्तर माहिती दिली. इयत्ता ३ री चा विद्यार्थी ओजस प्रशांत वाघ आणि इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी नक्षत्रा विजय पाटील यांनी मराठी भाषेची थोरवी वर्णन करणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. मराठी भाषेचा गोडवा आणि माय मराठीची थोरवी खूप महान आहे, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, दामिनी पगरिया, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, हर्षाली पूरभे, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड हे शिक्षकवर्ग यांच्यासह इयत्ता ५ वी ते ८ वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.