चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यपदी दिलीप घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. चाळीसगाव-गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यात अग्रणी असणारे तसेच चाळीसगाव येथील शिवसेनेचे प्रवक्ते उपस्थित होते.
सह्याद्री प्रतिष्ठानचे मा.प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड जाहिर करण्यात आली आहे, नुकतीच दौलताबाद येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय बैठकीत ही निवड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली असून या समितीत निलेश जेजुरकर सचिन शेंडगे गणेश खुटवड सदानंद पिलाणे गणेश रघुवीर दिलीप सोनवणे या सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
















