धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड या ग्रामीण भागातील निर्मल नेमाडे यांच्या ‘स्टार्टअप’ची Cornell University New York या जगप्रसिद्ध विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअपसाठी असणाऱ्या Cornellmaha60 या उपक्रमात निवड झाली आहे.
निर्मल नेमाडे यांच्या 10 हजार registration मधून 60 स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे. घन कचरा व्यवस्थापन व कृषी व्यवसाय या संकल्पनेवर आधारित त्यांच्या स्टार्टअप आयडियाला प्रशिक्षणासाठी पॅनलकडून पसंती मिळाली. Cornell University कडून प्रशिक्षण मिळणार असून शासनाच्या काही योजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. निर्मल नेमाडे यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत नांदेड गावी झाली आहे.
सेंद्रिय शेती व पर्यावरण संबंधित उपक्रमामध्ये त्यांना आवड आहे. ते डॉक्टर सुधाकर नेमाडे व विजया नेमाडे यांचे कनिष्ठ चिरंजीव असून अतुल नेमाडे यांचे लहान बंधू आहेत. नवनवीन स्टार्टअप साठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी सर्व ग्रामीण भागातल्या उद्योजकाकडून प्रशासनाचे आभार मानले आहेत.