TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सेक्स वर्कर्स’ महिलांच्या समस्या आणि कायदेशिर अधिकार विषयावर चर्चासत्र !

नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर,स्वाधार महिला संघ आणि आधार बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘सेक्स वर्कर्स’ महिलांच्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर नुकतेच शहरातील हॉटेल सिल्वर पॅलेस येथे एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर (NNSW), संग्राम संस्था सांगली, स्वाधार महिला संघ, अमळनेर आणि आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

सदर चर्चा सत्राचा मुख्य उद्देश १९ मे 2022 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘सेक्स वर्कर’ यांच्या अधिकारांच्या बाबतित निर्देश जारी केले आहेत. सर्व सेक्स वर्कर्सना संविधाना नुसार सन्मानाचे जीवन कसे जगता येइल?, या विषयी सुप्रीम कोर्ट पॅनलने न्यायालयाला तपशिलवार शिफारसी केल्या आहेत. सदर चर्चासत्राच्या कार्यक्रमात विधिसेवा प्राधिकरणचे जळगाव जिल्हयातील वकील प्रतिनिधी, जळगाव शहरातील पोलिस अधिकारी, सेक्स वर्कर सोबत कार्य करणाऱ्या विविध सामाजीक संस्थेचे प्रतिनिधी, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी व लैंगिक कामगार प्रतिनिधी आणि जिल्हा एडस, नियंत्रण कार्यालयाचे प्रतिनिधी, मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

या चर्चा सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणुन विधि सेवा प्राधिकरण जळगाव, यांचे सचिव सय्यद सर उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड ललिताताई पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या सुरवातीला उद्घाटन सत्रामध्ये मान्यवरच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सेक्स वर्कर्स महिलांच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधार बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ.भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा उद्देश ,आधार आणि स्वाधार संघ यांचे सेक्स वर्कर महिलांसाठीचे मागील 25 वर्षातील केलेल्या कामाची ओळख करून दिली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक अँड. ललिताताई पाटील यांनी सेक्स वर्कर्स महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सुप्रीम कोर्टाने दिलेले दिशा निर्देश, त्यावर आपण अजून काय सूचना देऊ शकतो यावर प्रकाश टाकला.

19 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना या बाबतित सविस्तर मांडणी केली. त्यानंतर पोलिस प्रतिनिधी म्हणुन आवतारे मॅडम यांनी सेक्स वर्कर महिलांना होणाऱ्या पोलीस कार्यवाहीत यापुढे आम्ही या निर्देशांचे पालन करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. पोलिस निरीक्षक व एस.पी. पाटील मॅडम (उपनिरीक्षक) यांनी आपली भूमिका माडली. मा. सय्यद सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विधी सेवा मार्फत सुरु असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व सेक्स वर्कर महिलांच्या बाबतीत असलेल्या कायदयांची अंमलबजावणी करत असतांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन कसे करावे?, व महिलांनी जास्तीत जास्त प्रशिक्षण व माहिती घेऊन सक्षम व्हावे, असे आवाहन केले. सदर चर्चा सत्रामध्ये सुमारे 75 प्रतीनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमात आलेल्या लैंगिक कामगार भगिनी यांच्या वतीने फरिदा काझी व रीनादिदी यांनी त्यांच्या सोबत घडलेले प्रसंग सांगितले. त्यानंतर चर्चासत्र सर्वांना खुले केले गेले.

या प्रतिनिधीनीं घेतला चर्चासत्रात सहभाग !

1) अँड. जे. जे. खान 2) अँड मंजुला मुंदडा, 3) अँड अभिजित मेने 4) संजय धनघट (संग्राम प्रतिनिधी) 5 )आशा सोनार (गोदावरी फाउंडेशन) 6) विजय वाघमारे (मिडिया प्रतिनिधी) 7)भारती कुमावत (मनोधैर्य समिती) 8) संजय पहुरकर ( कार्यक्रम अधिकारी DAPCU) 9) अँड स्वाती निकम 10) ॲड. बडगुजर अमळनेर 11) ॲड. जास्वंदी भंडारी भुसावळ 12) प्रा. विजयकुमार वाघमारे (समाजकार्य महाविद्यालय. अमळनेर) इ. मान्यवरांनी चर्चासत्रात आपले मते व दृष्टिक्षेप टाकून सकारात्मक चर्चा घडवुन आणली.
सदर चर्चा सत्राला यशस्वी करण्याकरिता आधार बहुउद्देशिय संस्था, स्वाधार महिला संघ, संग्राम संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रा. विजय कुमार वाघमारे यांनी आधार संस्था राबवित असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती देऊन, भारतातील सेक्स वर्कर महिलांची सामाजीक परिस्थिती यावर सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आधार संस्थेचे दिपक संदानशिव यांनी केले व आभार रेणु प्रसाद मॅडम यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्त शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बीएचआर’ घोटाळा : तपासाचे धागेदोरे आता समृद्धी महामार्ग आणि जलसंपदा प्रकल्पाच्या ठेक्याकडे !

November 30, 2020

महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना ; ४७ एजन्सीज बडतर्फ

June 17, 2022

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; 17 महिलांना कारने उडवलं, 5 जणींचा मृत्यू !

February 14, 2023

कृषी पर्यवेक्षकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहात अटक !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group