चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील पोदार शाळेजवळ 35 वर्षीय तरुणाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज सायंकाळी उघडकीस आल्यानंतर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दिनेश उर्फ भावडू पवार (35) असे मयताचे नाव आहे.
शहरातील पोदार शाळेजवळ दिनेश पवार हा तरुण आल्यानंतर काही संशयीतांनी धारदार चाकूचे वार करीत दिनेशची हत्या केली. अतिरक्तस्त्रावामुळे दिनेशचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. खून करणार्या आरोपींना निष्पन्न करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. खुनाची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शहरचे निरीक्षक के.के.पाटील व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. खून करणार्या आरोपींना निष्पन्न करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.