जळगाव (प्रतिनिधी) शहरातील के.सी. पार्क परिसरातील त्रिभुवन कॉलनीत दि. 27 जुलैच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास एकाच्या घरावर दगडफेकसह गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगावातील के.सी.पार्क परिसरातील त्रिभुवन कॉलनीत राहणाऱ्या अशोक माने यांच्या घरावर दगडफेकीसह गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी मोठा आवाज झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत आदींनी घटनास्थळी भेट दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ते तिन वेळा गोळीबार झाल्याचे चर्चा आहे. तर जुन्या वादातून अज्ञात इसमांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शुभम माने हा वाळू व्यावसायिक असल्याचीही चर्चा असून टोळक्याने खंडणीसाठी त्यांच्या घरासमोर राडा घातल्याची चर्चा आहे. या टोळक्याने दोन-तीन फैरी झाडल्याचेही वृत्त असून हल्लेखोरांनी शुभम माने याला धमकावत पलायन केले.