नाशिक (प्रतिनिधी) छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला अटक केली आहे.
एकदा नाही तर वारंवार महिलेला धमकी देत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत म्हटलंय की, आरोपीने त्र्यंबकेश्वरच्या एका लॉजमध्ये १७ डिसेंबरला पूर्ण रात्र बलात्कार केला. जेव्हा पीडितेने आरोपीच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्या छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याचप्रकारे त्याने धमकी देत पीडित महिलेवर विविध ठिकाणी अनेकदा बलात्कार केले.
आरोपी आजाद शेखने संबंधित महिलेसोबत १७ डिसेंबरला रात्री लॉजवर बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणीही आरोपीने महिलेवर अतिप्रसंग केला. त्यानंतर महिलेला सोडून दिलं आणि नाशिकमधून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपी रेल्वे स्टेशनला पोहचला होता आणि बाहेर जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होता परंतु पोलिसांना त्याची कारनाम्याची भनक लागली. तातडीने पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन गाठलं आणि आरोपीला पकडण्यात यश आलं. या महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी आजाद शेखवर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.