जळगाव (प्रतिनिधी) मंगळवारी दिवसभरात शहरातील वेगवेगळ्या भागांमधून तब्बल सात दुचाकी चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण तलाव परिसरातील अमीत करतारलाल थाराणी (वय ३५) यांची (एमएच १९, बीव्ही ५७३५) क्रमांकाची दुचाकी सिंधी कॉलनीतील लक्ष्मी अपार्टमेंटमधून दि. १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास चोरीस गेली. दुसरी घटना ही शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अनिल प्रेमचंद साहित्या (वय ४८, रा. मोहाडी रोड) यांची (एमएच १९, ईबी ६४७४) क्रमांकाची दुचाकी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरुन चोरुन नेली. तर तिसरी घटना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रामदास पाटील (वय ४३, रा. शांतीनगर, सावखेडा शिवार) यांची (एमएच १९, एएल ९५६७) क्रमांकाची दुचाकी घरासमोरुन दि. १९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरुन नेली. त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतून चार दुचाकी लंपास
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वसीम शेख मुक्तार (वय ३८, रा. सालार नगर) यांची (एमएच ४७, एक्यु ६८३६) क्रमांकाची दुचाकी ट्रान्सपोर्ट नगरातून चोरुन नेली. त्यानंतर शिरसोली प्र. न. येथून जगदिश गोकुळ भुते (वय ३२, रा. पाटील वाडा, शिरसोली) यांची (एमएच १९, सीए २६४४) क्रमांकाची दुचाकी घरासमोरुन लांबवली. तर शिरसोली प्र, बो. येथील नितीन रमेश काटोले (वय ४०) यांची (एमएच १५, सीयू ५७९२) क्रमांकाची दुचाकी घरासमोरुन चोरट्यांनी चोरुन नेली. तर शुभम सदाशिव जयकर (वय २७, रा. गायत्रीनगर, शिरसोली रोड) यांची (एमएच १९, एझेड २३५०) क्रमांकाची दुचाकी नेहरु नगरातून चोरुन नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















