TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मेट्रो कारशेडबाबत शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत’ : देवेंद्र फडणवीस

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) मुंबई मेट्रो कारशेडचा गुंता आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कारशेडबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. पवारांबाबत मला विश्वास असून, त्यांनी याबाबतचा अहवाल वाचल्यावर ते व्यवहार्य निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत,’ अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांशी वस्तुस्थिती समजून घेऊन बोलावे,’ असाही सल्ला त्यांनी दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारशेडबाबत विरोधकांवर केलेल्या टीकेला उत्तर दिले. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी या प्रश्नावर पवार हे पंतप्रधानांशी बोलून मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर ‘पवारांबरोबर आमचे कितीही वैचारिक मतभेद असले, तरी ते याबाबतचा अहवाल वाचतील, तेव्हा व्यवहार्य निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, याचा मला विश्वास आहे,’ असे फडणवीस म्हणाले. ‘मेट्रो प्रकल्प हा कोणाच्या प्रतिष्ठेचा विषय नाही. हा राज्य सरकारच्या एकट्याचाही प्रकल्प नाही. केंद्र सरकार यामध्ये ५० टक्के भागीदार असून, ‘जायका’कडून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत या प्रकल्पाबाबत काही बदलणे म्हणजे हा प्रकल्प अडचणीत आणण्यासारखे आहे. या प्रकल्पाबाबत आपण भावनिकतेने जोडले गेले असून तो होऊ नये, असे कोणाचेही मत नाही. या प्रकल्पाच्या अनेक अडचणीही आपण सोडविल्या आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कांजूरमार्गला कारशेड करायचे असेल, तरीही आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल. त्याशिवाय ही कारशेड होऊ शकत नाही हे सत्य का लपवत आहात,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मेट्रो प्रकल्पात राज्य सरकार इतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे. केंद्राच्या मदतीने JICA ने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारनं यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. यापुढेसुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची वाढली चिंता; भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकासकांसाठी गरजेनुसार निधीची उपलब्धता : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

October 9, 2021

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना धमकी

November 25, 2020

धरणगाव येथील प्रा डॉ. अतुल सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

May 24, 2022

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० हजारापेक्षा अधिक व्यक्तींकडून ६३ लाखाचा दंड वसूल

April 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group