मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही,तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद, असे खरमरीत पत्र शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. दरम्यान, राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला पवार यांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही,तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे,उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत. तसेच निधर्म वादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही, असे शरद पवारांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरु आहे.