TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शीना बोरा हत्या प्रकरण : इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2022
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjea) जामीन मिळाल्यानंतर साडेसहा वर्षांनंतर आज, शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आली. जामीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिची सुटका झाली.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तिच्या जामिनाच्या अटी सीबीआय न्यायालयाने गुरुवारी निश्चित केल्या. त्यानुसार इंद्राणीची दोन लाख रुपयांच्या जातमुचल्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गेल्या साडेसहा वर्षांपासून इंद्राणी कारागृहात होती. सत्र आणि उच्च न्यायालयाने सात वेळा तिला जामीन नाकारला होता. परंतु तिने कारागृहात काढलेल्या कालावधीची, नजीकच्या काळात तिच्यावर चालवण्यात येणारा खटला संपण्याची चिन्हे नसल्याची आणि अन्य आरोपींना जामीन मिळाल्याची बाब लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी इंद्राणीला जामीन मंजूर केला होता.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय?

दोन लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढय़ाच किंमतीच्या हमीवर इंद्राणीची भायखळा महिला कारागृहातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हमीदार हजर करण्यासाठी न्यायालयाने इंद्राणीला दोन आठवडय़ांची मुदत दिली आहे. याशिवाय जामिनावर बाहेर असताना तिने पुरावे नष्ट करू नये, साक्षीदारांना प्रभावित करू नये, तसेच जामिनावरील आरोपींशी संपर्क साधू नये, असेही न्यायालयाने तिची जामिनावर सुटका करण्याचे आदेश देताना स्पष्ट केले.

प्रकरण काय?

शीना बोराची २०१२ मध्ये हत्या झाली होती. परंतु हे हत्याकांड २०१५ मध्ये उघडकीस आले होते. इंद्राणीचा चालक श्याम राय याला पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली. त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना शीना बोरा हत्याकांड उघडकीस आले. न्यायालयाचा आदेश.. इंद्राणीवर सुरू असलेल्या खटल्यात काही साक्षी नोंदवण्यात आल्या असल्या तरी खटला बराच काळ चालू शकतो. शिवाय हे संपूर्ण प्रकरण केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा खटला लवकर संपणार नाही. प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपीला जामिनाचा हक्क असतो, असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही इंद्राणीला सशर्त जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

आता चेक बाऊंस झाला तर खैर नाही ; जाणून घ्या..सर्वोच्च न्यायालयाने काय दिले निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना

January 16, 2021

जामनेरात गौणखनिज प्रकरण : कारवाईला राजकीय वळण, माजी नगरसेवकांसह चौघांना अटक !

February 9, 2024

दुर्दैवी : विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू !

June 27, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १७ नोव्हेंबर २०२२ !

November 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group