धरणगाव (प्रतिनिधी) हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगवेगळे धर्म आहेत, परंतु त्यांच्यातील एकता आणि सौहार्द हे भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरम्यान, डॉ. परवेज देशपांडे यांनी पाळधी गावात शीरखुर्मा पार्टीचे आयोजन केले होते.
हिंदू आणि मुस्लिम एकता ही भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आवश्यक आहे. दोन्ही धर्मांमधील एकता आणि सौहार्द हे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे असून यावेळी पाळधी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सामाजिक सलोक्याच्या संदेश दिला.
शीरखुर्मा पार्टीमध्ये पाळधी गावाचे राजकीय मंडळी गावाचे सुप्रसिद्ध लोक उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, उपसरपंच दिलीप बापू पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, माजी सरपंच हेमंत पाटील, माजी सरपंच शरद कासट, माजी सरपंच संजू भैया देशमुख, गोपाल कासट, अमोल कासट, माजी उपसरपंच नईम देशपांडे, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, आरिफ देशपांडें, रियाज देशपांडे आणि गावातले हिंदू – मुस्लिम बांधव उपस्थित होते.