मुंबई (वृत्तसंस्था) मुद्दा कुठलाही असो अभिनेते मुकेश खन्ना अगदी परखड बोलतात. आता मुकेश खन्ना यांनी राज कुंद्रा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. नवऱ्याचे कारनामे बायकोला माहीतच नाही, हे शक्यंच नाही. शिल्पा शेट्टीला १२० टक्के माहिती असणार, असा दावा मुकेश खन्ना यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. त्यामुळे आपण उगाचच काहीतरी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. पण पॉर्न तयार करणं गुन्हा आहे. यामुळे आपली तरूण पिढी वाईट मार्गाला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. त्यामुळे पॉर्नोग्राफीला चाप बसेल. परंतु या प्रकरणात शिल्पा शेट्टीला जबाबदार धरणं योग्य ठरणार नाही. कारण समोर आलेल्या माहितीनुसार तिचा पती हे काळे धंदे करत होता. पण तिला याबद्दल नक्कीच माहिती असणार. तिचा पती दररोज कोट्यवधींच्या उलाढाली करतो. कोट्यवधी रुपये कमावतो अन् त्याला हे पैसे कसे मिळतात हे शिल्पा माहित नाही हे मान्य करणं थोडं कठीण आहे.”
















