मुंबई (वृत्तसंस्था) पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला बिझनेसमन राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला क्राइम ब्रांचने काही प्रश्न केले आहेत. दरम्यान राज आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टीच्या घरात क्राईम ब्रांचने छापेमारी केली. या वेळी राज आणि शिल्पा यांना समोरासमोर बसवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीला हे १० प्रश्न विचारण्यात आले होते.
वियान कंपनी खूप चांगली कमाई करत होती. शेअर मार्केटमध्ये तिचा भाव वाधारला होता तरी देखील कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला?
वियान आणि कॅमरिन या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहाराबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
पोर्न व्हिडीओ लंडनला पाठवण्यासाठी वियान कंपनीच्या ऑफिसचा वापर केला जात होता. याबद्दल तुम्हाला माहिती होती का?
हॉटशॉट या अॅपबद्दल काही माहिती आहे?
हॉटशॉटवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओंविषयी काही माहिती आहे का?
हॉटशॉटच्या व्यवहारांत तुम्ही देखील सामिल आहात का?
प्रदीप बक्क्षीसोबत हॉटशॉटबद्दल कधी चर्चा केली का?
पोलिसांच्या हाती लागलेल्या ईमेल आणि वॉट्स अॅप चॅटबद्दल काही माहिती आहे का?
राज कुंद्राच्या व्यवसायाविषयी काही माहिती आहे का? तो नेमका काय व्यवसाय करतो?
राज कुंद्रा आपल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्हाला काही माहिती देतो का?
राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे.
बँक खात्यांचीही होणार तपासणी
पोर्नोग्राफीतील पैसे शिल्पा शेट्टी यांच्याही बँक खात्यात गेले आहेत का, हे शोधण्यासाठी त्यांची बँक खाती तपासण्यात येणार आहेत. तसेच कुंद्रा यांच्यासोबत कुठल्या कंपनीत त्यांची भागीदारी आहे का, याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. तसेच, या प्रकरणाशी शिल्पाचा थेट संबंध जोडता येईल, असा कोणताही पुरावा आपल्याला मिळालेला नाही, असे मुंबई पुलिसांनी म्हटले आहे.