धरणगाव (प्रतिनिधी) आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहून जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहावे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते व प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
धरणगाव येथिल जी. एस. लॉन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते. मेळाव्याप्रसंगी प्रसंगी गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याकरिता शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहावे. पक्ष संघटनेला महत्त्व देऊन सर्वांनी एकदिलाने काम करावे. निवडून द्यावयाच्या ४०६ ग्रामपंचायत सदस्यांपैकी तब्बल २२५ म्हणजे ५६ टक्के महिला निवडून येणार असल्याने महिलांचा प्रभाव या ग्रामपंचायतीवर दिसणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांना निवडणुकीत उभे करावे. माझी स्वतः साठी निवडणूक समजून मी सर्वोतोपरी सहकार्य करणार असून सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घ्यावी अश्या सूचनाही गुलाबराव पाटील यांनी केल्या.
निवडणूककिसाठी कार्यकर्त्यांची एकजूट महत्वाची – जिल्हाप्रमुख
प्रत्येक गावात भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीसाठी गाफील न राहता नियोजन करून कार्यकर्त्यांची एकजूट महत्वाची आहे तसेच तालुक्यातील गाव-गाव आणि घर-घर शिवसैनिक नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, पी. एम. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. धरणगाव तालुक्यात ७० ग्रा.पं. ती पैकी तब्बल ४७ ग्रा.पं. तिच्या १५१ वार्डाची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. एकूण १५१ वार्डातुन ४०३ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यात तब्बल २२५ महिलांसाठी (५६%) जागा राखीव आहेत. तर उर्वरित १७८ जागांमधून सर्वसाधारण-५२, ओबीसी-५१, अनु.जाती-२७ तर अनु.जमाती-४८ या प्रवर्गातून निवडून येणार आहेत.
महिलांसाठी आरक्षण असे
सर्वसाधारण महिला -१२५, ओबीसी महिला – ५३, अनुसूचित जाती महिला – १०, अनु.जमातीसाठी – ३७ व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , जि. प. सदस्य गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे, उप जिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, राजेंद्र ठाकरे, भगवान महाजन, उप सभापती प्रेमराज पाटील आसाराम कोळी यांची तर प्रमुख उपस्थिती गटनेते पप्पू भावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन, प्रेमराज पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन माजी सभापती प्रमोद पाटील, आसाराम कोळी, अनिल पाटील, दिपक सोनवणे, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, बुट्या पाटील, पापा वाघेरे माजी उपनगराध्यक्ष करण वाघरे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कल्पना कापडने, जना अक्का पाटील, हेमंत चौधरी, उपतालुक प्रमुख मोती आप्पा पाटील, उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, भानुदास पाटील, अपंग सेना जिल्हाप्रमुख अक्षय महाजन, अरविद चौधरी, गोलू चौधरी, नगरसेवक नंदू पाटील, कुणाल इंगळे, वसीम पीजरी, सचिन सोनवणे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी तालुक्यातील ४७ ग्रा पं तीचे निवडणूक बाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन रोकडे यांनी केले तर आभार पी. एम. पाटील यांनी मानले.