वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत काल (दि.८) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. या हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगाही दिसत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे.
जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती. या हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगाही दिसत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या हिंसाचाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या हिंसाचारादरम्यान यात भारताचा तिरंगाही दिसत आहे. यावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला. “ज्यानं कोणी यादरम्यान तिरंगा फडकावला होता त्याला लाज वाटली पाहिजे. दुसऱ्या देशांमध्ये होणाऱ्या अशा हिंसाचारामध्ये आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये आमच्या देशाचा तिरंगा वापरू नका,” असं म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला. याशिवाय भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनीही या घटनेवर सवाल उपस्थित केलेत. वरुण गांधी यांनी ट्विटरद्वारे, तिथे भारताचा झेंडा का आहे? असा सवाल विचारलाय. ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाहीये असंही गांधी म्हणाले.
दरम्यान, अमेरिकी काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचार केला. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले. पण अखेर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
संसद परिसरात जसजशी आपल्या समर्थकांची गर्दी होऊ लागली तसतसा मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उत्साह संचारला. त्यांनी अधिक संख्येनं लोकांनी यावं, असं आवाहन केले. मात्र, समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात करताच ट्रम्प यांनी ‘या निवडणुकीत निश्चितच घोटाळा झाला आहे. परंतु तुम्ही त्यांच्या हातचे बाहुले होऊ नका. शांतता राखा आणि घरी जा,’ असं आवाहन समर्थकांना केलं.