धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यात निभोरा, हिंगोने बु, चोरगाव या ग्रामपंचायतीवर शिवसेना भगवा फडकला आहे. निभोरा सरपंचपदी आरुणाबाई देविदास पाटील तर उपसरपंचपदी प्रीतल सुदर्शन पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावज वाघ यांनी सरपंचपदाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हिंगोने बु. सरपंचपदी संजय रमेश पाटील यांची निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी अक्षय अंबर सोनवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य जितेंद्र शिवदास पाटील, प्रकाश शिवा बोरसे, मोतीलाल बळीराम पाटील आदी उपस्थित होते. चोरगाव सरपंचपदी उशाबाई ज्ञानेश्वर सोनवणे यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी प्रवीण रमेश पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य ज्ञानेश्वर जीवराम सोनवणे, निर्लमाबाई प्रकाश पवार, गुलाब शंकर सोनवणे आदी उपस्थित होते. हिंगोणे खुर्द येथील नवनिर्वाचित सरपंचपदी अरुण भाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली. उपसरपंचपदी प्रविण चुणीलाल बोरसे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य अमोल विक्रम पाटील, निवृत्ती चंद्रसिग मालचे, वनिलाल शेंपडू सोनवणे, सुभाष बाबूलाल मोरे, शाखा प्रमुख साहेबराव पुळलीक पाटील, युवा शाखा प्रमुख सागर पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, किशोर बोरसे, हेमंत पाटील, भिवसन नाईक, राजू महाजन, रवींद्र पाटील, ईश्वर पवार, अतुल पाटील, प्रभाकर केदार, महेश केदार, बस्तीलाल सोनवणे, माजी उपसरपंच एकनाथ सोनवणे, रमेश पवार, दिनेश सपकाळे, भगवान कुवर, सुभाष महाजन, योगेश पाटील, कोमल पाटील, समाधान पाटील, वैभव केदार, दिपक रोकडे, दिपक जगताप, वासुदेव महाजन, निवृत्ती पाटील, गंगाराम अहिरे आदी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
प.स. सदस्य डी ओ पाटील, युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, अमोल विक्रम पाटील, प.स. सदस्य नवल रामदास बोरसे, शिवसेना शाखा प्रमुख संजय पाटील, गोकुळ पाटील, समाधान कोळी, हिरालाल पाटील, संजय तोताराम बाविस्कर, शानुबाई धोंडू सोनवणे, कविताबाई विनोद पवार, दीपाली विजय सोनवणे, दत्तात्रय ठाकरे, पुडलीक सोनवणे, संजय सोनवणे, खेमराज सोनवणे, गौरव सोनवणे, विनोद पवार, प्रकाश पवार, अनिल बाविस्कर, विजय सोनवणे, ज्ञानेश्वर पवार, हिरालाल सोनवणे आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
















