धरणगाव (प्रतिनिधी) जागृती युवक मंडळातर्फे शिवव्याख्यान व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जागृती युवक मंडळातर्फे छत्रपतींचे स्वराज्य-अठरा पगड जातींचे’ या विषयावर लक्ष्मण पाटील यांचे व्याख्यान तसेच मागील अनेक वर्षांपासून नावीन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण पध्दतीने नवरात्रोत्सव साजरा करुन सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या जागृती युवक मंडळाच्या सर्व जेष्ठ मान्यवरांचा कृतज्ञता (सन्मान) सोहळा धरणगाव मरीमाता मंदिर येथे आज दि. १३ ऑक्टोबर, रात्री आठ आयोजित करण्यात आला आहे.
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी.जी. पाटील, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, धरणगाव माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, भाजप ओबिसीचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन, रा.कॉ.जि.उपाध्यक्ष दीपक वाघमारे, सामाजिक समरसता मंचचे अध्यक्ष प्रा.आर.एन. महाजन, कबचौउमविचे व्यवस्थापन परीषद सदस्य प्रा.डी.आर. पाटील, माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भीमराज पाटील, तेली चौधरी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष सुनील चौधरी, क्षत्रिय मराठे समाज पंच मंडळाचे अध्यक्ष पडूरंग माणिक मराठे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्षा भानुदासआप्पा विसावे, मरिमाता मंदिर संस्थानचे अध्यक्ष किशोर महाजन, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन, बालाजी पतसंस्थेचे चेअमन मंगलदास भाटिया, जगदंबा कन्स्ट्रक्शनचे वाल्मीक प्रभाकर पाटील, गटनेते विनय भावे, भाजप गटनेते कैलास माळी, नगरसेवक विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन.
कार्यक्रमाचे आयोजक
कडू महाजन, अरुण पाटील, रघुनाथ चौधरी, पुंडलिक माळी, दगा मराठे, दिलीप पाटील, राजेंद्र महाजन, राजेंद्र किसन महाजन, गणेश पाटील, आनंद पाटील.