TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्ञानव्यापी मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग आढळले ; हिंदू पक्षाच्या वकिलांचा दावा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणावेळी (Gyanvapi Masjid survey) मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग आढळले आहे, असा दावा हिंदू पक्षाचे वकील विष्णु जैन यांनी केला आहे. तर मुस्लिम पक्षकारांनी हा दावा फेटाळला आहे. दरम्यान, वाराणसी न्यायालयाने शिवलिंग मिळालेली जागा सील करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

वारणासीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी संपले. या सर्वेक्षणाचा शेवट वादळी झाला. तिसऱ्या दिवसाचं सर्वेक्षण समाप्त होताच मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी पाहणीदरम्यान विहिरीच्या आत शिवलिंग सापडल्याचा दावा केला. शिवलिंगाच्या संरक्षणासाठी आता पुन्हा सिव्हिल कोर्टामध्ये अर्ज केला जाणार आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

हिंदू पक्षातले सोहनलाल यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशिदीत बाबा सापडले आहेत. तेच बाबा ज्याची नंदी वाट पाहत होता. मशिदीमध्ये शिवलिंग मिळाल्यानंतर हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या तसंच सर्वांनी आनंद साजरा केला. आता पश्चिमेकडच्या दरवाजाजवळ असलेल्या अवशेषांची तपासणी करण्याचीही आम्ही मागणी करणार आहोत,’ असं सोहनलाल म्हणाले. हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार 12 फूट 8 इंच व्यासाचं शिवलिंग सापडलं आहे. या शिवलिंगाचं तोंड नंदीकडे असून, वजूस्थळातलं सर्व पाणी काढून केलेल्या पाहणीवेळी ते आढळल्याचा त्यांचा दावा आहे.

मुस्लीम पक्षानं मात्र हा दावा फेटाळला आहे. ज्ञानवापी मशिद समितीनं या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या सर्वेक्षणाला थांबवण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावर मंगळवारी सुनावणी होऊ शकते. सर्वेक्षणाचा रिपोर्ट सार्वजनिक होणार की नाही याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारच्या सुनावणीमध्ये देण्याची शक्यता आहे.

सिव्हिल जजच्या (सीनिअर डिव्हिजन) आदेशानुसार, फिर्यादी आणि प्रतिवादी बाजू, तसंच कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचं पथक सर्वेक्षणासाठी ज्ञानवापी मशिदीत पोहोचलं होतं. रविवारीही ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी 12 वाजता सर्वेक्षणाचं काम पूर्ण होणार होतं; मात्र नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला. दुसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशिदीचा घुमट आणि भिंतींचं सर्वेक्षण करण्यात आलं.तळघराव्यतिरिक्त बाजूची भिंत, नमाज स्थळ, वजू स्थळ या ठिकाणीही सर्वेक्षण करण्यात आलं. दरम्यान, सर्वेक्षण टीममधील सदस्य आरपी सिंह यांना सोमवारी सर्वेक्षणात सहभागी होऊ दिलेलं नाही. आरपी सिंह यांच्यावर आतील माहिती लीक केल्याचा आरोप आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धडाकेबाज कामगिरी : तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना पाजलं पाणी ; वनकर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दूध संघात सलग दुसऱ्या दिवशीही तपासणी ; आजपासून कागदपत्र पडताळणी सुरुवात होणार !

October 23, 2022

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025

धरणगाव रुग्णालयाला पालकमंत्र्यांनी दिली भेट !

April 27, 2021

महानगरपालिका प्रशासनाची कडक कारवाई ; थकबाकीदारांच्या मालमत्ता केल्या जप्त !

January 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group