चाळीसगाव (प्रतिनिधी) धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसची कपलींग तुटल्याने रेल्वेच्या अर्ध्या बोग्या पुढे गेल्या. तर अर्ध्या बोग्या या मागेच राहिल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.
लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस ( गाडी नंबर 12141) ही मुंबईहून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेले तर रेल्वेचे अर्धे डब्बे मागेच राहिले. डब्ब्यांचे कपलिंग सुटल्याने अर्धी ट्रेन मागे राहिली. मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. अर्धे डब्बे मागेच राहिल्यानंतर रेल्वे दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. वेळीच सदर प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. धावत्या रेल्वेचे काही डबे अचानक वेगळे झाल्याने प्रवाशांनी आरडाओरडा सुरू झाली. सदर प्रकार लोकोपायलटच्या लक्षात आल्यानंतर एक्स्प्रेस थांबवली. परंतु, इंजिनबरोबर अर्धे डबे दोन ते तीन किलो मीटर लांब गेले होते, त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत तुटलेले डबे मागे घेऊन ते पुन्हा जोडण्यात आले. पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे काही काळ मात्र, रेल्वेतील प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.