वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज (३० जानेवारी) स्मृतीदिनानिमित्त जगभरातून अभिवादन केलं जात असताना, त्यांच्या कार्याला उजाळा दिला जात असतानाच अमेरिकेतून मात्र खळबळजनक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एका बागेमध्ये बसवण्यात आलेल्या गांधीजींच्या सहा फुटी पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे. या घटनेचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
अमेरिकेतील काही अज्ञातांनी पार्कमधील महात्मा गांधी यांचा पुतळा तोडला. या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी या प्रकाराची कडक शब्दांत निंदा केली असून द्वेष भावनेने करण्यात आलेल्या या गुन्ह्याची स्थानिक प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. उत्तर कॅलिफोर्नियाच्या डेविसमधील सेंट्रल पार्कमध्ये गांधीच्या पुतळ्याच्या गुडघ्यावर घाव घालत तोडण्यात आलंय. मुर्तींच्या अर्ध्या चेहऱ्याला नुकसान पोहवण्यात आलंय. तर अर्धा चेहरा गायब आहे. ही मुर्ती ६ फूट उंच असून तिचे वजन २९४ किलोग्रॅम इतके आहे. काही महिन्यांपुर्वी गांधीजींच्या पुतळ्याचे नुकसान करण्याची घटना अमेरिकेत घडली होती. याप्रकरणी सखोल चौकशी केली जावी अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केलीय. महात्मा गांधींचा हा पुतळा भारत सरकारने दाविस शहराला भेट दिला होता. स्थानिक महापालिकेने तो चार वर्षांपूर्व येथील सेन्ट्रल पार्कमध्ये बसवला होता.
महात्मा गांधींची मुर्ती तोडणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. यामागचे कारण शोधले जात आहे. डेविस शहरातील सेंट्रल पार्कमध्ये ४ वर्षांपुर्वी महात्मा गांधींची मुर्ती लावण्यात आली होती. या विभागात महात्मा गांधी आणि भारत विरोधी संघटनांचे आंदोलन सुरु होते.