भुसावळ (प्रतिनिधी) चार गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह २० वर्षीय तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपसिंह गुरुमुखसिंह कलानी असे संशयित आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दीपसिंह गुरुमुखसिंह कलानी (वय २० रा. तीतरान्या पोस्ट हेलापटाव जिल्हा खरगोन राज्य मध्यप्रदेश) हा
चार गावठी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतुस बाळगताना मिळुन आला. भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी त्याला अटक केली आहे. तसेच संशयीताच्या अंग झडतीतून २५,००० रुपये किंमतीचे एक लोखंडी गावठी कट्टा मॅक्झिनसह सदर कट्ट्यावर ग्रिपवर काळ्या रंगाचे पट्टी असलेला, २५,००० रुपये किंमतीचे एक लोखंडी गावठी कट्टा मॅक्झिनसह सदर कट्ट्यावर ग्रिपवर काळ्या रंगाचे पट्टे असलेला, २५,००० रुपये किंमतीचे एक लोखंडी गावठी कट्टा मॅगझीनसह सदर कट्ट्यावर ग्रिपवर कल्याण रंगाचे पट्टी, २५,००० रुपये किंमतीचे एक लोखंडी गावठी कट्टा मॅगझीनसह सदर कट्ट्यावर ग्रिपवर पिवळ्या व सफेद रंगाचे पट्टी असलेला जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो कॉ प्रशांत रमेश परदेशी (नेम भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि हरिष भोये करीत आहेत.
















