नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ढाब्यावरच जेवण प्रत्येकालाच आवडतं. तिथल्या जेवणावर प्रत्येकालाच ताव मारायचा असतो. पण, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक माणूस थुंकून रोटी बनवत आहे. त्या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओ गाझियाबादच्या सिहानीगेट भागातील चिकन कॉर्नरचा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये व्यक्ती तंदूरी रोटी करीत असताना दिसत आहे. रोटी तयार करीत असताना गव्हापासून तयार केलेल्या रोटीवर तो आधी थुंकतो आणि त्यानंतर ती भट्टीत टाकतो. मात्र कोणाचच त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. रेस्टॉरंटच्या बाहेर एक व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला, जो आता व्हायरल झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाजियाबादमधील पोलीस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका चिकन पॉइंटचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ दोन दिवस जुना आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मोठा गोंधळ घातला आणि चिकन पॉइंटविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत आंदोलन केलं. ज्यानंतर पोलिसांनी हालचाल करीत रोटी तयार करणाऱ्या तमीजुद्दीनने व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आणि चिकन पॉइंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.