मुंबई (वृत्तसंस्था) वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चार तृतीयपंथीयांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. या प्रकरणी चारही तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली आहे.
संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान छेडा नगर जंक्शनजवळ क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने रिक्षा थांबवून कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस विनोद सोनावणे (वय ३८) यांनी रिक्षा थांबवली आणि ई-चालानची प्रक्रिया सुरूवात केली. यावेळी त्याच रिक्षातून प्रवास करणारे चार तृतीयपंथीय खाली उतरले आणि त्यांनी सोनावणे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर सोनावणे यांचा गणवेशही फाडला. या मारहाणीत वॉकीटॉकी फुटला. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात लव्हली पाटील (वय २७), विकी कांबळे (२६), तनू ठाकूर (२४) आणि जेबा शेख (२४) या चारही आरोपीं विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.