चाळीसगाव (प्रतिनिधी) घराबाहेर असलेला पत्र्याच्या कुलरला खेळताना दोन चिमुकल्यांना शॉक बसला व त्यातच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. ही आज घटना दुपारी १२.३० च्या सुमारास शहरातील मेहतर कॉलनी येथे घडली.
याबाबत वृत्त असे की, राणु विकी गोयल (वय-३ वर्ष) व रोहन राकेश गोयल (वय- ३ वर्ष) रा. मेहतर कॉलनी ता. चाळीसगाव दोघेही घरासमोर खेळत होते. दरम्यान, पत्र्याचा कुलर बाहेर चालू असताना अचानक कुलरचा शॉक बसला व त्यातच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२.३० च्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने वडील विकी गोयल व राकेश गोयल दोघेही खासगी दवाखान्यात साफसफाईचे काम करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. मात्र हे अपघात घडल्याने दोघांवर डोंगरच कोसळला आहे.