TheClearNews.Com
Monday, December 15, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

स्वागतासाठी निघालेल्या भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांचा लक्षवेधी सहभाग

vijay waghmare by vijay waghmare
February 24, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘अर्हम विज्जा’चे प्रणेते, श्रमण संघीय उपाध्याय प्रवर, ओजस्वी वक्ता श्री प्रविणऋषीजी महाराज साहेब व मधुरगायक, सेवाभावी श्री तीर्थेशऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासा निमित्त गणपतीनगर स्थित स्वाध्याय भवन येथे मंगल प्रवेश झाला. जळगावकरांच्या प्रेमापोटी ‘वर्षी-तप’ सारखी कठीण तपश्चर्या सुरू असताना ७०० किलोमिटरची पदयात्रा विहार करीत श्री. प्रविणऋषीजी म.सा. जळगावात पोहचले. दोन्ही संतांच्या स्वागतासाठी निघालेल्या भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जैन हिल्स येथून आज सकाळी श्री प्रविणऋषीजी म. सा. व श्री. तीर्थेशऋषीजी म. सा. यांनी पायी विहारास सुरवात केली. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन होते. भाऊंचे उद्यान काव्यरत्नावली चौक येथून समाजबांधवांनी गुरूभगवंतांच्या स्वागतासाठी आकर्षक शोभायात्रेचे आयोजन केले होते.

READ ALSO

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, संघहितैषी प्रदीप रायसोनी, मंत्री अनिल कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२५ चे अध्यक्ष राजकुमार सेठिया, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, दादावाडी विश्वस्त प्रदीप मुथा, जयमल संघाचे स्वरूप लुंकड, पारस राका, साधूमार्गी संघाचे मोतीलाल मुणोत, विनोद मल्हारा, रत्नसंघाचे सुनील बाफना व अमर जैन तसेच पदाधिकारी यांच्यासह जय आनंद ग्रुप, युवाचार्य ग्रुप, श्रमण महिला मंडळ, आदी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

‘अहिंसा परमो धर्म’चा दिला संदेश

भाऊंच्या उद्याना जवळील काव्यरत्नावली चौकातून उत्साहात निघालेली शोभायात्रा ही जैन धर्मनाथ मंदीर, अल्पबचत निवास मार्गे स्वाध्याय भवन येथे पोहचली. कलशधारी कन्या, अष्टमंगल, अर्हम विज्जा त्यात ‘आत्मा में परमात्मा की अनुभूती कराने की कला, श्रेष्ठत्व जीवन का निर्माण, मातृत्व एवं पितृत्व को दिव्य अनुभूती के साथ जीना’ असे सामाजिक संदेश दिले होते. आनंद ओवी, जैन ध्वजद्वारे ‘अहिंसा परमो धर्म’ हेच मनुष्य कल्याणाचे साधन असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश-घोषणा शोभायात्रेतून दिल्या गेल्या.

स्वाध्याय भवन प्रांगणात आल्यावर श्रावक-श्राविकांनी अष्टमंगल व अष्टप्रतिहार्य व जैन ध्वज ऊंचावून गुरूमहाराजांचे भावस्पर्शी स्वागत केले. जैन युवा फाऊंडेशन तर्फे स्वागतपर भक्तीनृत्य तर श्रमण संघ महिला मंडळाच्या वतीने स्वागत गीताने गुरुमहाराजांचे मनोभावे स्वागत केले गेले. कस्तुरचंद बाफना यांनी मनोगतातून काव्यमय प्रस्तूती केली.

श्री. प्रविणऋषीजी म.सा. यांनी आशीर्वादपर मनोगतात ‘जळगावमध्ये आधी दोन वेळा विहार मार्गात असल्याने आलो. पहिल्यांदाच जळगावकरांच्या विशेष विनंतीवरून ७०० किलोमिटरची पदयात्रा करुन आलो. स्वर्णनगरी म्हणून ओळख असलेले जळगाव, धर्मनगरी म्हणूनही प्रसिद्ध असल्याची प्रचिती ठिक-ठिकाणी लागलेल्या बोर्डवरून आली. जळगावकरांची धर्माप्रती असलेली दृढ आस्था, उत्साह पाहून खूप आनंद झाला. आमचे याठिकाणी येणे सार्थकी झाले.’ जैन दर्शनमध्ये चार प्रकाराचे ध्यान सांगितले आहे. यातील ‘धर्मध्यान’ आपल्या जीवनात कसे आचरण करावे याबाबत सखोल विवेचन पुढील १५ दिवस प्रवचनात केले जाणार आहे. अनिल कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे नवकारशीची व्यवस्था करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJain irrigation

Related Posts

जळगाव

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

December 14, 2025
जळगाव

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 14, 2025
गुन्हे

वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

December 14, 2025
जळगाव

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

December 13, 2025
जळगाव

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

December 13, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

Today horoscope :  वाचा.. आजचे सविस्तर राशिभविष्य 25 फेब्रुवारी 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवखेडेसिम येथे हिंस्र प्राण्याने पाडला जनावरांचा फडशा !

September 27, 2022

धरणगावजवळ भीषण अपघात ; दुचाकीस्वाराला आयशरने उडवले !

May 26, 2023

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात !

June 10, 2021

मुंबई महापालिकेने दिलेली मुभा; लवादाच्या आदेशाचे उल्लंघन

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group