धरणगाव (प्रतिनिधी) येथील जुनी पोलीस लाईन जवळ (अभी आखाडा) येथे गुरुपौर्णिमा / व्यासपूजा उत्सवानिमित्त श्री दत्तात्रय महाराज यांच्या महापूजा व महाप्रसादाचे आयोजन गुरुवारी दिनांक १० जुलै २०२५ रोजी करण्यात आले आहे.
या धार्मिक आणि भक्तिपरायण कार्यक्रमाचे हे ५१ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने आयोजन करण्यात येत आहे. दुपारी १२:०० वाजता आरती, सकाळी ४:०० वाजता काकडा आरती, तर महाप्रसादाचे वेळ दुपारी १ ते ४ अशी असेल. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असून सर्वांनी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन प.पू. गुरुवर्य राजयोगी श्री धनराजनाथजी व त्यांच्या आध्यात्मिक परंपरेतील प.पू. गुरुवर्य स्व. राजयोगिनी माताजी यांच्या स्नेहशिष्यांनी केले असून, भक्तांनी या पवित्र कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संयोजक श्री. दत्तात्रय सत्संग मंडळ असून अधिक माहितीसाठी संपर्क – मो. 9423492910