धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जन्माष्टमीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या वाईस चेअरमन मालती पवार व प्रतिभा मोरे या उपस्थित होत्या.
सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्य वैशाली पवार यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले त्यानंतर कृष्णाचे पूजन व आरती करण्यात आली. लड्डू गोपाळचा झुला झुलवण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर असे कृष्णाच्या रासलीलेचे नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी मडके फोडून दहीहंडीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करत हा दिवस साजरा करण्यात आला.
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. शाळेच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिलोचना बडगुजर यांनी केले. या कार्यक्रमास शाळेच्या सिमरन खाटीक, अनिता, छाया पाटील, एकता राणी, वेदांती गुजराती, शीला चौधरी, तहजीब खाटीक, पूजा चौधरी, मृणाली सोनवणे, वैशाली जैन, दिव्या पाटील, जान्हवी महाजन, राधा भंडारी, अंकिता पवार माधुरी पाटील, राखी भागवत या शिक्षिका उपस्थित होत्या.