लंडन (वृत्तसंस्था) ब्रिटन फायझरच्या कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला होता. ब्रिटनमध्ये मंगळवारपासून लसीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने तातडीने इशारा जारी केला. कोरोना लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर २४ तासांमध्ये साइड इफेक्टस जाणवल्याने ब्रिटन सरकारची चिंता वाढली.
ब्रिटनमध्ये मंगळवारपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले असून फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येत आहे. कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने तातडीने इशारा जारी केला. लसीचे साइड इफेक्टस झालेले दोघेहीजण आरोग्य कर्मचारी आहेत. लस टोचल्यामुळे दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली होती. आता मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काळजी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही आरोग्य कर्मचाऱ्यांना Anaphylactoid Reactions झाली होती. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (एनएचएस) सांगितले की, या लसीमुळे झालेले दुष्परिणाम हे एलर्जीमुळे झाले आहेत. या प्रकारानंतर आता ब्रिटनच्या आरोग्य विभागाने सूचना जारी केली आहे. ज्या नागरिकांना, लस, औषध अथवा इतर प्रकारची एलर्जी असल्यास त्यांनी फायजरची लस न घेण्याचे निर्देश दिले आहेत. लसीकरण सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये ही सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे एलर्जी असलेल्या नागरिकांना आता लस देण्यात येणार नाही.