TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

vijay waghmare by vijay waghmare
February 8, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, काळानुसार त्यात सातत्याने बदल होत आहेत. यांत्रिक उपकरणांपासून ते डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास आपण सर्वच क्षेत्रांत अनुभवत आहोत. घड्याळ, टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर, मोबाईल यांसारख्या साधनांप्रमाणेच आता वीज मोजणीच्या क्षेत्रातही स्मार्ट तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणकडून राज्यातील ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाईम आंफ डे) वीजमीटर बसवण्यात येत आहेत. 9 ते 23 फेब्रुवारीदरम्यान स्मार्ट मीटर पंधरवडा साजरा होत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया स्मार्ट मीटरचे फायदे.

महावितरण ही राज्यातील सुमारे 3 कोटी 16 लाख वीजग्राहकांना वीजपुरवठा करणारी शासकीय कंपनी असून, वीजबिलांच्या अचूकतेला आणि पारदर्शकतेला तिने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापूर्वी फोटो मीटर रीडिंग, मोबाईल अॅपद्वारे रीडिंग, केंद्रीकृत बिलिंग प्रणाली यांसारखे उपक्रम राबवून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आता त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे स्मार्ट टीओडी मीटर होय.
स्मार्ट टीओडी मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित आणि अचूक मीटर रीडिंग. जुन्या पद्धतीत मानवी हस्तक्षेपामुळे चुकांची शक्यता असायची, अंदाजे बिल दिले जायचे किंवा रीडिंग न मिळाल्यास तक्रारी निर्माण व्हायच्या. स्मार्ट मीटरमुळे हे सर्व प्रश्न संपुष्टात येणार असून, दरमहा अचूक वापरानुसारच बिल तयार होणार आहे. घर बंद असले, कंपाउंड लॉक असले तरीही रीडिंग आपोआप घेतले जाणार आहे.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

या मीटरमधील टीओडी प्रणालीमुळे वीजदरात थेट सवलत मिळणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी या कालावधीत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. ही सवलत 1 जुलै 2025 पासून लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. घरगुती ग्राहकांचे वीजबिल स्मार्ट टीओडी मीटरमुळे आणखी कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्ट मीटर महावितरणकडून शंभर टक्के मोफत बसवण्यात येत आहेत. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. तसेच हे मीटर पोस्टपेडच असून, सध्याप्रमाणेच मासिक बिलिंग प्रणाली कायम आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतील, असा काही लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे; मात्र प्रत्यक्षात घरगुती ग्राहकांचे वीजदर प्रथमच कमी झाले आहेत.

सौर ऊर्जेच्या दृष्टीनेही स्मार्ट टीओडी मीटर अत्यंत उपयुक्त आहेत. नेटमीटर प्रणालीमुळे छतावरील सौर प्रकल्पातून निर्माण होणारी व वापरली जाणारी वीज तसेच ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज याचा अचूक हिशेब ठेवता येतो. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर विशेष फायदेशीर ठरणार आहेत.
एकूणच, स्मार्ट टीओडी मीटर म्हणजे अचूक बिलिंग, पारदर्शकता, वीजदरातील सवलत आणि ग्राहक-सुविधांचा संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्मार्ट मीटर बसविणे ही काळाची गरज असून, त्याचा थेट फायदा वीजग्राहकांनाच होणार आहे. ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी सहकार्य करून अचूक बिलांचा व सवलतींचा लाभ घ्यायला हवा.
– ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अमरावतीत तहसीलदाराच्या अंगावर चढवले ट्रॅक्टर

October 1, 2020

ब्रेकिंग न्यूज : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; 2 आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश !

July 20, 2022

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

July 23, 2021

जळगाव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखांत फसवणूक ; दिल्ली, राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

April 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group