TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

vijay waghmare by vijay waghmare
February 10, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

जळगाव प्रतिनिधी :  तंत्रज्ञानाच्या युगात घड्याळ, मोबाईल आणि टीव्ही ज्याप्रमाणे ‘स्मार्ट’ झाले, त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील वीज व्यवस्थाही कात टाकत आहे. महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे)’ वीजमीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर चक्क वीजदरात सवलत मिळवण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे. जळगाव परिमंडलात आतापर्यंत साडेचार लाख ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीजमीटर बसवण्यात आले असून, त्यांना अचूक बिलासह सवलतीचा लाभ होत आहे. या उपक्रमाबाबत काही लोकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र ग्राहकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
महावितरणने यापूर्वीही काळानुसार वीज मीटरमध्ये बदल केले आहेत. यांत्रिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक मीटरनंतर आता स्मार्ट डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जुने, सदोष किंवा नादुरुस्त मीटर बदलणे ही नियमित व कायदेशीर प्रक्रिया असून, त्यासाठी ग्राहकांची लेखी परवानगी आवश्यक नाही. ग्राहकांकडे बसवण्यात येणारे स्मार्ट टीओडी मीटर पूर्णतः मोफत असून, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. यासाठी कोणतेही कर्ज काढलेले नसून केंद्र सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबवला जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
जळगाव परिमंडलात आजपर्यंत 4 लाख 47 हजार 122 ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. त्यात जळगाव मंडलात 2 लाख 76 हजार 982, धुळे मंडलात 1 लाख4 हजार 266 तर नंदुरबार मंडलात 65 हजार 874 मीटर सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे बसवण्यात आले आहेत.
दिवसा वापरावर सवलत : स्मार्ट टीओडी मीटर हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार वीज वापर मोजण्याची सुविधा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत सवलत मिळत आहे. 1 जुलै 2025 पासून ही सवलत लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी अशा प्रकारचे ही पहिले ऐतिहासिक पाऊल महावितरणने उचलले आहे. एखादा घरगुती ग्राहक दरमहा 100 युनिट वीज वापरत असेल, तर जुन्या दरानुसार त्याचे बिल साधारणत: 875 रुपये येत होते. नवीन दरकपात आणि स्मार्ट मीटरच्या टीओडी सवलतीमुळे हेच बिल आता फक्त 784 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहक थेट आपले पैसे वाचवू शकतात.
सरासरी बिले होणार इतिहासजमा : अचूक रीडिंगमुळे ‘सरासरी’ किंवा ‘अंदाजे’ बिलांचा त्रास संपणार आहे. जेवढी वीज वापरली, तेवढेच बिल येणार. हे मीटर पूर्णपणे पोस्टपेड आहेत. सध्याच्या मासिक पद्धतीप्रमाणेच ग्राहकांना बिल भरायचे आहे. महावितरणच्या खास ‘अ‍ॅप’वर तुम्हाला तासागणिक किती वीज वापरली जात आहे, याची माहिती मिळेल. घर बंद असले तरी मीटर रीडिंग आपोआप मुख्यालयात नोंदवले जाईल.
सौर ऊर्जा ग्राहकांसाठी वरदान : ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प लावणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त आहे. हे मीटर नेट-मीटरिंगचे कामही करते, ज्यामुळे तुम्ही ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज आणि स्वतः वापरलेली वीज याचा अचूक हिशेब ठेवणे सोपे होईल.
ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्मार्ट मीटर हे पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि वीजबिलात सवलत देण्यासाठीच आणले आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करा आणि आपले वीजबिल कमी करा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदी लादणे हा लोकमताचा अवमान : शिवसेना

November 12, 2020

धक्कादायक : बायको मेली एकाची अन् अनुदानासाठी दावा ठोकला तिघांनी !

February 18, 2022

…तर पुन्हा सर्व शाळा होतील बंद ; Omicron च्या प्रादुर्भावामुळे वर्षा गायकवाडांनी दिला इशारा

December 22, 2021

मनसे रस्ते आस्थापनाचे राज्य उपाध्यक्ष अतुल पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

October 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group