TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपल्याकडे येणार्‍या प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण करा : ना. गुलाबराव पाटील

युपीएससी व एमपीएससीतील यशवंतांच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय अधिकारी सुध्दा हा जनरल फिजीशियन प्रमाणे असतो. त्याच्याकडे शेकडो लोक हे शेकडो समस्या घेऊन येतात. या सर्वांचे निराकरण करण्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशतर्फे आयोजित उत्सव यशाचा-सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात ते बोलत होते.

एखादा शेतकरी हा जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात येतो तेव्हा त्याला परमेश्‍वराच्या देव्हारात आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा असते. या अपेक्षांची पूर्तता करण्याचे काम अधिकार्‍यांनी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनीय अधिकारी हे आपल्या लोकशाही प्रणालीचे दोन महत्वाचे घटक आहेत. अधिकारीपद हे फक्त मिरवण्यापुरते नसते, तर या माध्यमातून समाजसेवेची आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी मिळत असते. जिल्हाधिकारी म्हटले की, तो संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख असतो. हे पद खूप मोठे असले तरी तितकेच ते जबाबदारीचे आहे. ही जबाबदारी राजेश पाटील, अभिजीत राऊत, डॉ. प्रवीण मुंढे यांच्या सारखे अधिकारी अतिशय समर्थपणे पार पाडत असून त्यांचा आदर्शन नव्याने प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी सज्ज झालेल्यांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्ह्यातील युपीएससी आणि एमपीएससी परिक्षांमधील जिल्ह्यातील यशवंतांच्या पाठीवर दिलखुलासपणे कौतुकाची थाप देतांना त्यांनी वास्तवावर आधारित सल्ला देखील दिला.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

दीपस्तंभ फाऊंडेशतर्फे आयोजित उत्सव यशाचा-सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात आज मूळचे एरंडोल तालुक्यातील रहिवासी तथा सध्या पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह एमपीएससी परिक्षेतील यशवंतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे व आयकर आयुक्त विशाल मकवाना यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते युपीएससपीमधील यशवंत विनायक नरवाडे; गौरव साळुंखे; श्रीराज वाणी; अक्षय् साबद्रा; श्रीकांत कुलकर्णी; पूजा कदम यांच्यासह एमपीएससीत यश संपादन केलेल्या मानसी पाटील आणि नारायण इंगळे तसेच अधिकारी पदी उत्तीर्ण झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी प्रास्ताविकातून सत्कारार्थींचा परिचय करून दिला. राजेश पाटील, अभिजीत राऊत आणि डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात युपीएससीत उत्तीर्ण होणार्‍यांचा टक्का वाढल्याची बाब समाधानकारक आहे. राजेश पाटील हे आयएएस झाले असतांना एरंडोल तालुक्याचे आपण आमदार होतो. त्यांच्या पहिल्या सत्काराचा मान आपल्याला मिळाला होता. आज राजेश पाटील यांची देशभरात ख्याती असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आयएएस हा सेवेचा मापदंड आहे. विविध क्षेत्रांमधील यशवंत हे याच प्रमाणे आयुष्यात यशाचे शिखर गाठत असतात. याचा विचार केला असता आपण देखील राजकारणातील आयएएस असल्याचे ना. पाटील यांनी म्हटताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली. स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी जिद्द व चिकाटी तर आवश्यक आहेच. पण याच्या जोडीला प्रारब्धाची जोड देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अलीकडच्या काळात पालकांना शिक्षणाचे महत्व समजले असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

सुरतमध्ये पॅकेजिंग मिलला भीषण आग ; पाचव्या मजल्यावरून कामगारांनी मारल्या उड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर: देवगाव देवळीला पोलिसांच्या धाडीत ७५ हजारांचे रसायन नष्ट !

October 22, 2024

महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे मुंबई येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता शिबिर

September 21, 2021

खळबळजनक : जळगावच्या चित्रा चौक परिसरात एकाचा खून, दोन जखमी !

December 20, 2022

धरणगावातील सार्वजनिक शौचालय आठवड्यातून एकदा अॅसिडने स्वच्छ करण्यात यावे ; एकनाथ माळी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

March 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group