TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’ लावण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातले’ ; मनसेसह संघावर शिवसेनेची टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) हिंदुत्व आणि भोंग्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने (Shivsena) आजच्या सामनातून मनसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला आहे. सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. मग तो कुठल्याही जाती, धर्माचा का असेना! वीर सावरकर यांच्या संकल्पनेतले हिंदुत्व हे असे होते. त्यांनी अहिंसेचा तिरस्कार केला, पण त्यांची अहिंसा शौर्याची व मर्दाची होती. तसे हिंदुत्व आज कोठे दिसते आहे? मशिदींसदीं मोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करणे हे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे, भाजपसह संघालाही कानपिचक्या दिल्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे चीन आणि पाकिस्तानने गिळलेला तिबेट, कश्मीरचा भूभाग सोडवून घ्यायला हवा. बांगलादेशही भारताचाच भाग होता. पुन्हा पुराण काळातल्या भारतवर्षात अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि श्रीलंकाही आपलाच प्रदेश होता. नेपाळ हे सीतामाईचे माहेर, तर प्रभू श्रीरामाने श्रीलंकेवर स्वारी करून तो देश जिंकला होता. आता हा सर्व भाग जिंकून पंधरा वर्षांत अखंड भारताचे स्वप्न साकार होणार असेल तर त्या विचारांचे व योद्ध्यांचे स्वागत करावेच लागेल. फक्त त्याआधी कश्मीर खोऱ्यात पंडितांची घरवापसी करावी लागेल व गलवान व्हॅलीत घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर काढावे लागेल. मग अखंड हिंदू राष्ट्राचा झेंडा फडकायला किती वेळ लागणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

अग्रलेखात म्हटले आहे की, सरसंघचालक हे नेहमीच आदरणीय व्यक्तिमत्त्व राहिले आहे. सरसंघचालक काय बोलतात, काय करतात यावर देशाचे लक्ष असते. म्हणूनच सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी हरिद्वार मुक्कामी अखंड हिंदू राष्ट्राची जी संकल्पना मांडली त्यावर चर्चा सुरू झाली आहे. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो. त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच मार्गाने पुढे जाणार आहोत. मात्र आमच्या हातात दंडुके असतील.

पूज्य सरसंघचालक पुढे सांगतात, “हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. संत आणि ज्योतिष्यांच्या मते 20 ते 25 वर्षांत पुन्हा एकदा अखंड भारत तयार होईल.” सरसंघचालकांनी अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाला पुन्हा पंख लावले आहेत. अखंड भारत कोणाला नको आहे? राहुल गांधी यांनाही झोपेतून उठवले व अखंड भारताविषयी विचारले तर तेही सांगतील, हिंदुस्थानच्या सीमा आणि व्याप्ती वाढायला हवी.

आता सरसंघचालकांच्या कल्पनेतील अखंड हिंदुस्थान नक्की कसा असेल? अखंड भारताचा विषय आला की, फक्त पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवायचे या विचारांपुढे मजल जात नाही. वीर सावरकरांसारखे नेते संपूर्ण पाकिस्तान परत आणल्याशिवाय हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार नाही, या मताचे होते.

अखंड भारताचा प्रश्न निघालाच आहे म्हणून सांगायचे ते असे की, दोन वर्षांपासून चीनचे सैन्य लडाखमध्ये घुसून बसले आहे व त्या भागात आपले सैन्य पेट्रोलिंगलाही जाऊ शकत नाही. चीनच्या ताब्यातील हा भूभाग पुन्हा घेऊन अखंड हिंदू राष्ट्राचे श्रीफळ वाढवायला हवे व त्या कार्याच्या मागे संपूर्ण देश उभा राहील. सरसंघचालकांची भूमिका स्पष्ट आणि सडेतोड आहे. मोदी सरकारने त्या स्पष्ट भूमिकेचा विचार केलाच पाहिजे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #SanjayRaut

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पी.एम. पाटील यांचा महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या राज्य उपप्रमुख पदाचा राजीनामा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हायग्रा घेऊन आलेल्या ८१ वर्षीय पतीला दिला नकार ; नंतर पत्नीवर केले वार

March 27, 2022

लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक

June 26, 2021

वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर महिला पथकाकडून कारवाई

May 19, 2025

परमबीर सिंग यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

April 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group