धरणगाव (प्रतिनिधी) भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोना मुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने नुकतेच लसीकरण शिबीर तिळवण तेली समाज मंदिर, तेली तलाव जवळ, धरणगाव, येथे आयोजित केले होते.
शिबीराचे उदघाटन
रामकृष्ण भगवान महाजन(माळी समाज अध्यक्ष), भिका राजाराम चौधरी (चौधरी समाज माजीअध्यक्ष), पांडुरंग माणिक मराठे (मराठे समाज अध्यक्ष), पुरुषोत्तम विष्णुसा सुतारे (स.क्षत्रिय समाज अध्यक्ष), भिमराज अर्जुन पाटील(पाटील समाज अध्यक्ष), हरिश्चंद्र भगवान भावसार (भावसार समाज अध्यक्ष), सागर कासार (कासार समाज सचिव) आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व समाज बांधवांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. तसेच शिबिराच्या उदघाटनास आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सुनिल भाऊ चौधरी मित्रपरीवाराने सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर ठाकरे यांनी केले.
शिबिरास भेट दिलेले प्रमुख मान्यवर
भाजप जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, शिरिषअप्पा बयास,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, सिव्हील सर्जन डॉ.किरण पाटील, पत्रकार डी.एस. पाटील, कडू महाजन, अँड.ईजराहील खाटीक, गुड शेफर्ड प्रिन्सिपल चैताली रावतोळे तिळवण तेली समाज संचालक मंडळ व समाज बांधव यांनी लसीकरण शिबीरास भेट दिली.
याप्रसंगी उपस्थित भाजपचे पदाधिकारी
शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, भालचंद्र माळी, सुनिल चौधरी, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, अनिल महाजन, रवी पाटील, सचिन पाटील, विजय महाजन, रवींद्र मराठे, शरद चौधरी, अमोल कासार, गोपाल चौधरी, विशाल ठाकरे, मनिष चौधरी, जयेश ठाकरे, विक्की महाजन, नितीन महाजन, रमेश चौधरी, किरण चौधरी, गणेश चौधरी, यश ठाकरे, ओम चौधरी, विशाल महाजन, सागर निंबा ठाकरे, प्रकाश महाजन, अरविंद चौधरी, गौरव चौधरी आदी उपस्थित होते.
कोरोना सन्मान पत्र वाटप
लसीकरणास मेहनत घेणारे नर्स, व स्टॉप, रजिस्ट्रेशन करणारे सर्व कर्मचारी व कार्यकर्ते यांचा कोरोना सन्मान पत्र देऊन सुनिल भाऊ चौधरी यांनी सत्कार केला.
शिबीराचे आयोजन
सुनिल पंढरीनाथ चौधरी (तेली समाज अध्यक्ष तथा भाजप ओबीसी तालुकाध्यक्ष) यांनी केले होते. डॉ.मयूर जैन, उमेश येवले, भूषण पालीवाल, अविनाश चौधरी यांचे सहकार्य लाभले.