धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचपूरा येथील नूतन ग्रुप माध्यमिक विद्यालयात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.के. पाटील यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.जी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सीताराम पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले उपस्थित होत्या.
कार्यक्रमात केंद्रप्रमुख प्रमोद पाटील, विकास पाटील, सरपंच कैलास पाटील, सुरेश गुंजाळ, माजी सरपंच गोकुळ पाटील, गटशिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील, माध्यमिक पतपेढीचे संचालक आर.बी. चव्हाण तसेच मुख्याध्यापक किरण पाटील, के.एस. पाटील, प्रियंका पाटील, वंदना पाटील, वाय.पी. पाटील, एस.टी. पाटील, व्ही.बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, समूह नृत्य, नाटिका अशा विविध कलाविष्कारांची सुंदर सादरीकरणे सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्ही.बी. सपकाळे, पी.एन. पाटील व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमास चिंचपूरा, मुसळी व एकलग्न या गावांतील ग्रामस्थ, पालक, माता-भगिनी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाने परिसरातील नागरिकांना एकत्र येण्याची संधी दिली आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले.