पाळधी ता.धरणगाव (शेबाज देशपांडे) महाविकास आघाडीकडून आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यास पाळधी येथे १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महविकास आघाडीतर्फे पाळधीत आज बंद ठेवण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, माजी सभापती मुकुंद राव नन्नवरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी, साजिद महेबुब पटेल, मच्छिंद्र पाटील, आबा माळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाळधीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.