चाळीसगाव (प्रतिनिधी) देशभर सुरू असलेल्या शेतकरी न्यायासाठीचा आंदोलनाला महाराष्ट्रात महाविकासआघाडी जाहीर पाठिंबा दिला. तसेच यात जवळपास वीस संघटनांनी सहभाग घेतला. तसेच महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनास उत्फूर्त प्रतीसाद मिळाला.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चाळीसगावात महाविकासआघाडी मार्फत व्यापारी बांधवांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी आज शहरातून स्टेशन रोड ते बाजारपेठ घाटरोड, भडगाव रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशी संयुक्त रॅली काढून केंद्र सरकारच्या जाचक शेतकरी कायद्याविरोधात घोषणाबाजी करून शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड माजी नगरसेवक संजय ठाकरे जगदीश महाजन उपशहरप्रमुख शैलेंद्र सातपुते वसीम चेअरमन विभाग प्रमुख दिलीप पाटील शिरसगाव गटप्रमुख दिलीप पाटील, गणेशपुर सचिन ठाकरे सांगवी, बद्री राठोड, सागर पाटील, दिनेश घोरपडे, सुभाष राठोड, अजिंक्य बाविस्कर, सागर चौधरी, करण राठोड, सोनू कुमावत, निलेश गुंजाळ, सोनू देशमुख ,गणेश भवर, अनिल राठोड, रॉकी धामणे, आबा सैंदाणे, संदीप पाटील, विलास भोई, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनिलबापु निकम, देवेंद्र पाटील, ईश्वर जाधव, रमेश शिंपी, प्रदीप देशमुख, रवींद्र जाधव, नितीन परदेशी, नितीन सुर्यवंशी, सुधाकर कुमावत, ए. एल. पाटील, आर. डी. चौधरी, सुनील राजपूत, बापु चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जी. प. गटनेते शशी साळुंखे, दूध संघाचे संचालक प्रमोद बापू पाटील, खादी ग्रामोद्योग संचालक किसनराव जोर्वेकर, तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, देशमुख, जी. प .भूषण पाटील, जी. प सदस्य सीताराम चव्हाण, शेतकी संघ संचालक जया भोसले, जिल्हा युवा उपाध्यक्ष भैय्या पाटील, प. स. सदस्य बाजीराव दौंड, मिलिंद जाधव, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, दीपक पाटील, सूर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख सदाशिव, आप्पा गवळी, यज्ञेश बाविस्कर, शरदसिंग राजपूत, शेनफडू पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, राजू जाठ, आकाश पाटील, सुजित पाटील, योगेश पाटील, श्रीकांत राजपूत, शुभम पवार, पंजाब देशमुख, अमोल भोसले, कुशल देशमुख, स्वप्नील कोतकर, प्रकाश पाटील, चंद्रकांत महाजन, गुंजन मोटे, तुषार देशमुख, दीपक कच्छवा, मधुकर पाटील, जितू, बहूजन विकास आघाडीचे संभाजी जाधव, शेतकरी संघटनेचे आर. के. पाटील, बहुजन मुक्ती मोर्चा चे प्राध्यापक गौतम निकम आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.