चाळीसगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा व शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रमाअंतर्गत चाळीसगाव तालुक्यात पातोंडा व चाळीसगाव शहरातील नागद रोड भागात शिवसंपर्क अभियान घेण्यात आले. या अभियानास शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
संपूर्ण महाराष्ट्र शिव संपर्क अभियान राबविले जात असून याद्वारे शिवसैनिक नोंदणी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेटी आणि शिवसेना पक्षाचा विस्तार प्रचार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा व शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम या अभियानात घेतला जात आहे.
याच उपक्रमाअंतर्गत चाळीसगाव तालुक्यात पातोंडा व चाळीसगाव शहरातील नागद रोड भागात शिवसंपर्क अभियान घेण्यात आले. यावेळी चाळीसगाव अल्पसंख्यांक शहर प्रमुख वाशिम चेअरमन यांचा नागरी सत्कार देखील करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या ध्येयधोरणांची व विचारसरणीची माहिती तसेच पक्षीय कार्यपद्धती याबद्दल जळगाव जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने यांनी माहिती दिली. यावेळी कन्नडचे आमदार उदयसिंग परदेशी यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. शिवसंपर्क अभियानास शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागरिकांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदविला.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमूख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, उपतालुकाप्रमुख तुकाराम पाटील, महिला आघाडी उपजिल्हा प्रमूख प्रतिभा पवार, तालुकाप्रमुख सविता कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, वाशिम चेअरमन रघुनाथ कोळी होते तर अनेक शिवसैनिक शिवप्रेमी नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदविला. याच वेळी रेखा सोनार, अश्विनी जाधव प्रतिभा सोनार या महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.