TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेळ हे जीवन समृद्ध करून मानसिक व शारीरिक विकास घडवतात : पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले !

पी.आर.हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव व आनंद मेळाव्याचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in क्रीडा, धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) खेळ हे जीवन समृद्ध करतात, मानसिक आणि शारीरिक विकास घडवतात. खेळाचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद लुटला पाहिजे,असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी पी.आर.हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव आणि स्काऊट व गाईड आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरूण कुलकर्णी हे होते तर मंचावर राज्य व्हाॅलिबाॅल संघाचे चेअरमन तथा माजी विद्यार्थी रवींद्र कंखरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, पर्यवेक्षक कैलास वाघ, उमाकांत बोरसे, डॉ. बी.डी.शिरसाठ हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आणि क्रीडांगणाचे पुजन करून उद्घाटन करण्यात आले. रवींद्र कंखरे यांनी शाळेच्या व्हाॅलिबाॅल संघाला वर्षभरात लागणारे सर्व साहित्य देऊन मुले आणि मुलींचा संघ दत्तक घेत असल्याची घोषणा केली. डॉ. डहाळे आणि डॉ. कुलकर्णी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले.

READ ALSO

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

यावेळी स्काऊट व गाईड पथकांनी खरी कमाई अंतर्गत आनंद मेळावा आयोजित केलेल्या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांचे आणि मनोरंजक क्रीडा प्रकारांचे स्टाॅल लावण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालकांनी मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला. क्रीडा स्पर्धेत व्हाॅलिबाॅल, खो खो, कबड्डी, रिले, डाॅस बाॅल अशा क्रीडा प्रकारात विद्यार्थी खेळाडूंनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बेलदार यांनी तर आभारप्रदर्शन क्रीडा शिक्षक डी.एच.कोळी यांनी केले. यावेळी क्रीडा शिक्षक वाय.ए. पाटील, एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील , कर्मचारी राजेंद्र पवार, प्रवीण तिवारी, नितीन बडगुजर यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
Next Post

जळगावात फिल्मीस्टाईल थरार : 'तुला आज खतमच करतो' म्हणत तरुणावर रोखली बंदूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी नववर्षाचा संकल्प !

January 1, 2025

जात निहाय जनगणना व मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती तेली समाजाला द्या !

October 10, 2020

जैन इरिगेशनतर्फे जागतिक जलदिवस साजरा ; ह.भ.प. हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन

March 22, 2022

जन्म दाखल्यांची पडताळणी ; दोषींवर होणार गुन्हे दाखल !

April 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group